एअरफोर्समध्ये कोर्टमार्शल होणं हे एक अतिशय लज्जास्पद प्रकार म्हणून मानला जातो. पूर्वीच्या काळी आर्मीमध्ये विशेषतः कॅशिरिंग अशी एक पनिशमेंट होती. कॅशिरिंग म्हणजे अक्च्युअली तुम्ही फिल्डमध्ये ऐनवेळी साहस दाखवायला कचरता किंवा तुमची ब्रेव्हरी किंवा तुमचा काय तो धाडसीपणा दाखवत नाही किंवा काही काही वेळेला अतिधाडसीपणा करून दाखवता की जो त्या कामाकरता उपयोगी नाही. अशा वेळेला त्या व्यक्तीला कॅशियर्ड केलं जातं. त्याच्या अंगावरची रँक बॅजेस काढून त्याला ढुंगणावर लाथ मारून हाकलून दिलं जातं आणि त्याचं पेन्शन वगैरे तेही बंद होते. म्हणजे तो एका अर्थाने तो डिस्कार्डेड माणूस होतो आणि तो आर्मीच्या संबंधात असल्याने लज्जास्पद असा हाकलून देण्याचा भाग झाला. तर ते कॅशिरिंग करण्याकरता म्हणून कोर्टमार्शलचा उपयोग होतो. त्याला फील्ड कोर्ट मार्शल म्हणतात आणि नॉर्मल कोर्ट मार्शल ज्यावेळेस कुठलेही युद्ध चालू नाही आहे शांततेच्या काळामध्ये जर काही चुका किंवा काही गुन्हे झाले तर त्याच्याकरता पनिशमेंट देण्याकरता कोर्टमार्शलची सोय असतेएकाला हवाईदलातून काढला तर एकाला आवर्जून ठेवावा असा निकाल दिला तो का द्यावा लागला?