मान्यवर लेखक आपले लेखन कसे करतात? त्यासाठी ते पूर्व तयारी कशी करतात? वेगवेगळे देशविदेशातील संदर्भ ग्रंथ मिळवून त्यातील पान व प्रकरण क्रमांकासह त्यांना ते कसे हाताळायला लागतात? अचूकपणे हव्या त्या वेळी त्यांना ते ते संदर्भ कसे आठवणीत राहतात? इंग्रजीतील मोठमोठ्या परिच्छेदांचे मराठीत अनुवाद करताना त्यांना सारखे इंग्रजी ते मराठी शब्दकोशाची मदत लागते का? त्यांच्या लेखनाच्या हस्तलिखित प्रक्रियेपासून ते नियतकालिकात किंवा पुस्तक रूपाने प्रकाशित होईपर्यंत काय काय त्यांना करावे लागते? वगैरे प्रश्न सामान्य वाचकांना पडतात.
प्रा. अद्वयानंद गळतगे सरांना ८ ऑगस्ट २०२३ ला ९२वे वर्ष झाली. या निमित्ताने पुण्यात मराठी साहित्य परिषदेच्या सभागृहात त्यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांच्या या वयात त्यांचा दिनक्रम काय असतो? वगैरे विचारणा मला अनेकदा विचारात पाडत होत्या.