मागच्या जन्मातील त्याची आवडती वेश्या पद्मा आपल्या गंगा या लहान बहिणीला घेऊन त्याला भेटायला आली. बिशनचंदला ती म्हणाली, " तू आता लहान आहेस. मी वयस्कर झाले आहे”. बिशनचंद तिच्यापेक्षा वयानी लहान असलेल्या, पण लक्ष्मीनारायणच्या मृत्यूच्या वेळचे जे वय होते त्याच वयाच्या तिच्या बहिणीच्या मांडीवर जाऊन बसला!
बी.रामगुलाम यानी सांगितले की बिशनचंद एकदा त्यांना म्हणाला, “बाबा तुम्ही एक बाई का ठेवून घेत नाही? तिच्यामुळे तुम्हाला फार मोठे सुख मिळेल”.
अत्यंत आश्चर्यचकित झालेले असतानाही स्वतःला सावरून बी. रामगुलाम यानी त्याला विचारले,"कसले सुख बाळ?” बिशनचंद म्हणाला "तिच्या केसाच्या सुगंधाचे सुख तुम्हाला मिळेल. तिच्या संगतीचे फारच सूख तुम्हाला मिळेल”. यावेळी त्याचे वय पाच वर्षाचे होते व त्याला लग्नाची बायको व ठेवलेली बाई यांच्यातील फरक कळत होता. असे बी. रामगुलाम यांनी म्हटले आहे.
पिलीभितच्या बिशनचंद कपूरला पुन्हा पुनर्जन्म नको आहे.
डॉक्टर सामोना यांची मुलगी अलेक्झांड्रिना १५ मार्च १९१० रोजी पाच वर्षे वयाची असताना वारली. मृत्यूच्या तीन दिवसानंतर त्यांची पत्नी अडेला सामोना हिच्या स्वप्नात ती मुलगी येऊन म्हणाली,"आई तू रडू नकोस. मी तुला सोडलेली नाही.थोडी दूर गेलेय इतकेच.