More Details

छत्रपती शिवाजी महाराजांच्या सूरतेवरील १६७० मधील दुसर्‍या मोहिमेवर आधारित प्रेझेंटेशन ४ भागात आहे पैकी पहिला भाग सादर.

पहिला तळ बारडोलीला … 

लुटीचे तीन किंवा जास्त भाग केले असावेत.

१.पहिला भाग बोजड सामानाचा -ओलेचिंब झाले, बुडले, नष्ट झाले तरी चालेल असे सामान.

२. दुसरा भाग- अती किमती माल - तयार हिरे, सुवर्णचे दाग-दागिने, सोन्या, चांदीच्या लडी-किंमत जास्त पण पाठीवरून वाहून न्यायला सोईचा असा कोठल्याही परिस्थितीत न गमवायचा ऐवज.

३. तिसरा भाग - गमावायला लागला तरी चालेल असा ऐवज.

परदेशातून आलेले कागदांचे गठ्ठे, किमती कापड तागे, मसाल्याचे पदार्थ, अफू? चहा? परदेशात विकायला तयार ठेवलेली मालाची खोकी, गठ्ठे, गासोड्या. रेशमी धागे, कापड, हा दहा हजार सैन्यापैकी सात हजार घोडदळ पुढची फळी (अॅडव्हान्स फोर्स) पुढे गेले असावे.


उरलेल्यांना सुरतच्या तापी नदीच्या पलीकडील काठावर, अहमदाबादहून सुभेदार बहादूर खानाचे सैन्य घेऊन आला तर त्याला थोपवला ठेवले असावे. या मध्ये महाराजांच्या आपल्या बरोबरचे १ हजार सैन्य मागच्या आणि पुढच्या फोर्सशी संपर्कात राहून आपल्या कडील सैन्य संचलनाच्या आज्ञा, संदेश मिळवून पुढील कूच करायचे नियोजन करण्यात मदत करत असावेत.