"महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही एक 'सर्कस' आहे. आपण (दाभोळकर) या सर्कसचे रिंग मास्टर असल्यानें" माझ्या रिंगणांत या, मग मी तुम्हाला कसा लोळवतो पहा" असा आपला पवित्रा तुमच्या दृष्टीनें शास्त्रीय पायावर आधारित पण भविष्य काळांत कसेही करून अंग काढून पसार होण्यास सोईचा आहे. तथापि या इथे नाडी भविष्य कर्ते, महर्षी हे 'रिंग मास्टर' आहेत ! भविष्याच्या आसूडाला तो "थोतांड" म्हणून आव्हान देऊन आपण रिंगणात उतरला आहात ! वर्तमान पत्रांतून परिपत्रके व लेख लिहून, मला मधे बालून, " पहा या रिंग मास्टरची कशी ऐशी की तैशी करतो" नाहीतर ५ लाख देतो" असे डरकाळ्या फोडणारे आवाज आपण वेळोवेळी साताऱ्यात बसून काढता ! मात्र मद्रास भागातील नाडी केंद्रास भेटी देण्याचे नाव काढीत नाही. कारण तेथे जाऊन पराजित झाल्यामुळे अं.नि.स. ला व पर्यायाने आपल्याला तोंड काळे करून घ्यायचे नाही !... आपल्या 'अंनिस सर्कस' चालायचे दिवस आता फार जिकारीचे झाले आहेत. प्रवीण कसरत पटू शिष्यगण आपणांस सोडून गेलेले आहेत. इतर शिलेदारांनाही आपल्या आसूडाचा बेगडीपणा लक्षांत आला आहे. वर्तमान पत्र वाले एकजात आपल्या विविध कृत्यांना आपल्यामागे कुत्सितपणे हसून नावे ठेवतात. मात्र तोंडावर व वर्तमानपत्रांतून नावे' ठेवायला आपल्या सर्कसचा दरारा मोठा असल्याने टाळतात. पण जे आपल्या कल्पना विश्वात तल्लीन असतात अशा आपणांस हे लक्षात आलेले नाही...
"...नाडी भविष्या बाबत आपल्या समितीचे मद्रासला 'पानिपत (वॉट) होणार, हे ओळखून आपण तिकडे गेला नाहीत तरी न जाताच स्वतःच्या घरी (महाराष्ट्रात) न जाण्यानेच तिचे पानिपत झाले. समितीचा मुकुट येथेच धुळीस मिळाला आहे."..
अपरोक्ष वाद घालण्यापेक्षा पुण्या मुंबईत, उभयतांच्या सवडीने, केव्हांही, एका
व्यासपीठावर वाद संवाद करायला ओक तयार आहेत. मात्र त्या आधी दाभोळकर व नारळीकरांनी स्वतःच्या व अन्य १० जणांच्या संदर्भात नाडी भविष्याची शाखीय कसोटी मद्रासला जाऊन ओकांच्या उपस्थितीत करून घ्यावी लागेल. अशी अट या साठी की त्यांच्या उपस्थिती शिवाय, कसोटी न करता केलीली चर्चा निरर्थक होईल...
" सवंग जाहिरात करण्यासाठी केलेली कुठलीही कृती अं. नि.स. चा बेगडीपणा निर्णायकपणे उघडकीस आणेल..."