Alka Oak's E-book shoppy🚩
Search

Cart

More Details

परामानसशास्त्र मरणोत्तर अस्तित्वाचेही संशोधन करते आणि म्हणून परामानसशास्त्राच्या बुद्धिवादी विरोधकांना ओघानेच मरणोत्तर अस्तित्वही नाकारणे भाग पडते. (खरे म्हणजे मरणोतर अस्तित्वाला परलोकाच्या कल्पनेला - त्यांचा मुळात विरोध असल्यामुळे आणि त्याचा परामानसशास्त्र अभ्यास करीत असल्यामुळेच त्या शास्त्राला त्यांचा विरोध असतो.) काहीजण मात्र (यात बुद्धिवाद्यांचा समावेश होत नाही. ) मरणोत्तर अस्तित्व नाकारण्यासाठी अतींद्रिय शक्तीचा आधार घेतात. म्हणजे हे लोक अतींद्रिय शक्तीच्या अस्तित्वामुळे मरणोत्तर अस्तित्वाच्या तथाकथित पुराव्याची उपपत्ती लावता येते व त्यामुळे मरणोत्तर अस्तित्व मानण्याची गरज नाही असे म्हणतात. अशा रीतीने मरणोत्तर अस्तित्व नाकारण्यासाठी अतींद्रिय शक्तीचे अस्तित्व मान्य करण्यावाचून गत्यंतर नाही हे या लोकांना मान्य करावे लागत असल्यामुळे यांना बुद्धिवादी म्हणता येत नाही.