Alka Oak's E-book shoppy🚩
Search

Cart

More Details

वणी दिंडोरी मार्गावरील जोरदार झडपांमुळे दमलेल्या मुगल सैन्याला विश्रांती व औषधोपचारघेत तळावर अडकून पडावे लागले असेल.


 

 कुंजरगडाची रचना आणि तिथे असलेले भुयारवजा नैसर्गिक बोगदा आपल्या किमती सामानाला लपवून आपल्या सैनिकांना मोत्यांची पोती, जड-जवाहिरांच्या पेट्या, इतर माल डोक्यावर वाहून कुंजरगडाचा अत्यंत अवघड चढ चढून ते सामान भुयाराच्या पोकळीत लावून त्याला दोन्ही बाजूंनी बांधकाम करून सील केले असावे. 

कुंजरगडाच्या नैसर्गिक रचनेचा फायदा घेत महाराज आता बरेच हलके सामान घेऊन मुरबाडच्या वाटेने कोकणात शिरले. तिथून ते नागावला पोहोचले. तिथे त्यांनी तोपर्यंत येणारी १० जहाजे पाहिली. मालधक्क्यावर सामान उतरवायला शेकडो कोळी लावले.

त्यांना न कळू देता उदगीरच्या आसपास असलेल्या आपल्या सैन्याने नांदेड दिग्रस असे करत करत २८८ किमी जाऊन विदर्भातील कारंजे व्यापारी पेठ गाठायची.  ३शे पेक्षा कमी सैनिकांना पेठेचे रक्षण करायला जमणार नाही ते पळून जातील. हे काम सरसेनापतींच्या नेतृत्वाने व्हावे असे ठरले. शिवाजी महाराज स्वतःः येत आहेत अशी बातमी आधी पासून कळायची सोय करावी लागेल.