पाश्चिमात्य भौतिक विज्ञानाने शोधलेल्या भौतिक- म्हणजे जड वा आंधळे- नियम हेच या विश्वातील अंतिम नियम असून ते अबाधित वा अनुल्लंघनीय आहेत असा त्यांचा दावा असतो.
परिस्थितीशी जुळवून घेण्याची कधीही न संपणारी जीवाच्या उत्क्रांतीची प्रक्रिया हा याच योजनेचा पुरावा आहे. दुर्बल व अशक्त जीव जातींचे नामशेष होणे व सबल व सशक्त जीव जातींनी त्यांची जागा घेणे, म्हणजे जीवनाचा झगड्यात सामर्थ्यवान जीवजाती टिकून राहणे, हा उत्क्रांतीचा अपरिवर्तनीय नियम असून तो प्रत्यक्षात क्रूर दिसत असला तरी अंतिमतः भव्य व उदात्त ध्येयाकडील वाटचालीचा तो निदर्शक आहे.
वस्तुस्थिती हे दाखवून देते की अत्यंत आंधळे (दिसणारे) निसर्ग नियम हे वास्तविकरीत्या जाणीव युक्त निसर्ग नियमांची कारागिरी आहे. ते निसर्गात्मे उच्च स्थानीय ग्रहाधिपतींच्या मार्गदर्शनाखाली आपली ही कामगिरी करीत असतात. हा ग्रहाधिपतींचा समुदाय म्हणजे अप्रकट ईश्वराचे नामरूपात्मक प्रगट जग असून तेच या विश्वाचे मन आहे. त्याच वेळी ते( विश्वाचे) न बदलणारे ( अंतिम) नियम ही आहे.”
ब्लॅव्हेट्स्कींनी भारतीय जादूगारांच्या जादूच्या प्रयोगांच्या रूपाने आव्हान दिले आहे. कारण भारतीय जादूगारांच्या प्रयोगांचे अधिष्ठान पाश्चिमात्य शास्त्रज्ञ म्हणतात त्याप्रमाणे, 'युक्त्या' (tricks) नसून आत्मतत्त्व आहे, हे ब्लॅव्हेट्स्कींना पाश्चिमात्य “भौतिकवादी जगाच्या निदर्शनास आणून द्यावयाचे आहे . ते आत्मतत्त्वच या विश्वाचे अंतिम सत्य असून त्याचे नियम हेच अंतिम व अनुल्लंघनीय नियम असल्याचे भौतिक विज्ञानाचे तथाकथित अनुल्लंघनीय नियम ते (आत्मतत्त्व ) उघडपणे उल्लंघून दाखवून देते. त्यामुळे त्या (भौतिक) नियमावर आधारलेला डार्विनचा उत्क्रांतीवाद आपोआपच खोटा ठरतो असे ब्लॅव्हेट्स्कीं यांचे प्रतिपादन आहे