नर्म विनोदी लेखन -
१. आधी गरज नंतर शोभा म्हणून पावलांचे सांगाती जन्मभर जोडीने प्रवासाला बरोबर येतात. खडावा,पादुका, सपाता, वहाणा, जूता, शूज, सॅन्डल नावे बदलत राहतात. रंगरूप जीवनशैली प्रमाणे वरखाली होत जाते. पण संगत सुटत नाही.
२. आयुष्यात असे अनेक प्रसंग येतात की आपली फजिती करून घ्यायची नसेल तर काही तरी शक्कल लढवून वेळ मारून न्यावी लागते. त्यावेळी सत्य-असत्य, खरे-खोटे याची तात्विक चर्चा करायला उसंत नसते. सत्य नेहमीच बोलले पाहिजे अशी अट घालून जीवन जगता येत नाही.
३.चेहऱ्यावरील काही स्नायूंच्या ताणांची परिणिती म्हणजे भाव दर्शन. ओठांची चंद्रकोर स्मितरेषा तर ओठांचा चंबू चुंबनाचा! कपाळाला आठ्या म्हणजे त्रासिकपणा तर उंचावलेल्या भुवया ताणले्ल्या अपेक्षा!