उत्क्रांती हा वैश्विक नाटकाचाच भाग
E Book 168
अगोदर कारण घडल्या खेरीज कार्य घडत नाही हे खरे आहे. उदा. बी पेरण्यापूर्वी रोप उगवणार नाही. पण अगोदर आणि नंतर हा कार्यकारण संबंध ‘ काल’ नावाच्या कोणा स्वतंत्र शक्तीमुळे निर्माण होत नसून ईश्वरामुळे( ब्रह्मामुळे) निर्माण होतो हे लक्षात ठेवले पाहिजे. ईश्वराला ‘ काल’ समजणे हा भ्रम आहे. उलट ‘ काला’ला ईश्वर समजणे हे सत्य आहे. हे अध्यात्मशास्त्रीय सत्य(जे आता भौत वैज्ञानिक प्रयोगाने सिद्ध होत आहे) व्यासमहर्षींनी जीवाची उत्क्रांती प्रक्रिया( संसारचक्र) वर्णन करताना भीष्मांच्या तोंडून फार पूर्वीच पुढील प्रमाणे महाभारतात सांगितले आहे; ते सत्य असे-
नाभ्येति कारणं कार्य न कार्य कारणं तथा I
कार्याणां तूपकरणे कालो भवति हेतु मान् II ( म. भा. शांतिपर्व.२११.११)
अर्थ: कारण कार्यात प्रवेश करत नाही( कारणामुळे कार्य घडत नाही.) कार्यही कारणात प्रवेश करत नाही. ( कार्यामुळेही कारण घडत नाही.) ( खरी गोष्ट अशी आहे की) ( संसारचक्राच्या वा उत्क्रांतीच्या) कार्याला काल रुपी ईश्वर कारण बनतो.