More Details

रामू व राजू या जुन्याचे पुनर्जन्म प्रकरण हे एक वैशिष्टयपूर्ण प्रकरण आहे, ते या अर्थाने की हे जुळे मागच्या जन्मीही जुळेच होते व दोघानाही आपण मागच्या जन्मी जुळे होतो हे तर आठवत होतेच शिवाय मागच्या जन्माचा सर्व तपशीलही त्या दोघानाही सारखाच आठवत होता. त्यामुळे त्यांच्या मागच्या जन्माच्या सत्यतेची खातरजमा परस्परपूरक ठरते. स्वयंसिद्धही ठरते. अर्थात त्याची तपासणी करूनच हे ठरविले पाहिजे,

रामू व राजू यांच्या चेहऱ्यात विलक्षण साम्य होते, तितकेच दोघात परस्पराबद्दल विलक्षण प्रेमही होते. इतके की ते एकमेकाना सोडून कधीच राहत नसत. जेवतानाही कधीच एकटे जेवत नसत. एकटा काही कामानिमित्त बाहेर गेला तर दुसरा त्याला लवकर परत येण्यास सांगे, दोघांच्या स्वभावात अर्थात फरक होता. गयाप्रसाद (त्यांचा काका) म्हणतात की रामू (भीमसेन) अधिक खट्याळ आहे. राजू (भीष्मपितामह) शांत स्वभावाचा आहे. उंचालालपूरमधील आपल्या मागच्या जन्मातील नातेवाइ‌काबद्दल दोघांनाही अतिशय प्रेम असले तरी त्या गावाला जाण्याचा त्यांनी कधीच हट्ट धरला नाही. तेथे कधीच तेथे गेले नाहींत. तीन वर्षाचे असताना त्या गावाच्या दिशेने दोघेही पळत जात होते, हाच काय तो याला एकमेव अपवाद होता. त्यावेळी विचारलेल्या प्रश्नाला दोघेही आपल्या घरी जात होतो, असे म्हणाले होते.