Alka Oak's E-book shoppy🚩
Search

Cart

More Details

ब्राझिलच्या रिओ ग्रँड इसुल प्रांतातील डोम फेलिसियानो नावाच्या खेड्याच्या पश्चिमेकडील १२ मैलावरील शेतातील घरात राहणाऱ्या एका श्रीमंत पशुपालकाच्या सिन्हा नावाच्या मुलीचा मार्ता लॉरेंझ नावाने झालेल्या पुनर्जन्माची ही कथा आहे. सिन्हाचा जन्म १८९० साली झाला, शेतातील घरात राहण्याच्या एकाकीपणामुळे अत्यंत दुःखी झालेल्या सिन्हाने १२ मैलावरील डोम फेलिसियानो खेडयात जाऊन एफ. व्ही. लॉरेंझ या जिल्हा शिक्षकाची पत्नी इदा लॉरेंझ हिच्याशी मैत्री जुळवली होती. व त्या कुटुंबाशी घरोबा केला होता. सिन्हा दोनदा पुरुषांच्या प्रेमात पडली.

२. पॉलो लॉरेंझ२. पॉलो लॉरेंझ

पॉलो लॉरेंझचे पुनर्जन्म प्रकरण हे वरील लॉरेझच्याच कुटुंबातील प्रकरण आहे. (वरील मार्ताच्या) प्रकरणात पॉलोने आत्महत्या केल्याचा उल्लेख आहे - ज्याचा मार्ताला जबर मानसिक धक्का बसल्याचे सांगितले आहे.) एफ. व्ही. लॉरेंझ व इदा लॉरेंझ या दंपतीची मुलगी एमीलिया ही मेल्यानंतर परत त्यांच्याच पोटी पॉलो मुलगा म्हणून जन्माला आली. हे  लिंगातर होते.

सायनाइड हे अत्यंत विषारी द्रन्य सेवन करून तिने १२ ऑक्टोबर १९२१ रोजी आत्महत्या केली. या वेळी तिचे वय १९ वर्षाचे होते. अशा रीतीने अविवाहित राहूनच ती गेली.  तिच्या मृत्यूनंतर तिच्या आईने (इदा लॉरेंझने) एका मृतात्म्या त्यासाठीच्या बैठकीत भाग घेतला. त्या बैठकीत आपण एमीलिया असल्याचे सांगणार्‍या या एका मृतात्म्याने इदाला म्हटले,  “मी आत्महत्या केली याबद्दल दिलगीर आहे? मृतात्मा पुढे तो म्हणाला, "मी लॉरेंझ कुटुंबातच पुन्हा जन्म घेणार आहे? इदाचा यावर विश्वास बसला नाही. पण नंतरच्या तीन वेगवेगळ्या बैठकीत पुन्हा त्याच गोष्टीचा पुनरुचार करून मृतात्मा म्हणाला, "मम्मा, मी तुझ्या पोटी तुझा मुलगा म्हणून जन्म घेणार आहे. माझा स्वीकार कर."