बहुविध आयामी महर्षी अगस्त्य
महर्षी अगस्त्यांची व्यक्तिरेखा साकार करणारे हे रंगित चित्र आता सार्वत्रिकपणे वेगवेगळ्या माध्यामातून प्रकाशात येत आहे. नाडी ग्रंथ भविष्य जगतात अगस्त्यांचे स्थान उच्च कोटीतील आहे. आजकाल नाडी केंद्रातून भविष्य कथन करायला ताडपट्ट्यांचे जे साठे उपलब्ध आहेत त्याचे कर्ता महर्षी ते आहेत. अगस्त्यांच्या निर्देशनातील ९० टक्के ताडपत्रे लेखन एकट्या अगस्त्य महर्षींच्या नावाने प्रचलित ताडपट्ट्यातून केले जाते.