Alka Oak's E-book shoppy🚩
Search

Cart

More Details

2024 E Book 196 भाग १७. इंग्लंड मधील जुळ्यांची केस  १४ . डार्विनवाद  17 December 2024 

एकबीजी जुळ्यांची प्रकरणे जनुकशास्त्र कसे निकामी ठरवतात

 

 गिलियन व जेनिफर हे जुळे एकबीजी असल्याचे प्रारंभी सांगितले आहे. या पूर्वी आपण पाहिलेल्या जुळ्यांच्या प्रकरणापैकी श्रीलंकेतील इंदि‌का व कक्षप्पा हे जुळेही एकबीजी असल्याचे आढळून आले आहे. श्रीलंकेतील जुळ्याचे ते प्रकरण (डार्विनवादी) जनुक सिध्दांत कसे कुचकामी ठरखते हे आपण त्या प्रकरणात विस्ताराने पाहिले आहे (प्रकरण १४) डार्विनचा उत्क्रांतिवादी सिद्धांत ज्यावर पूर्णपणे आधारलेला आहे ते जनुकशास्त्र (genetics) सांगते की जनुके (genes) हीच जीवाचे सर्व गुणधर्म ठरवतात, एकबीजी जुळ्याची, म्हणजे एकाच फलित बीजापासून (zyglote) जन्मलेल्या दोन व्यक्तिंची जनुके जनुकशास्त्रानुसार एक- सारखीच (identical) असतात. त्यामुळे त्यांचे सर्व गुणधर्म या शास्त्रानुसार एकसारखेच असावयास पाहिजेत हे उघड आहे. पण आपण पाहिले आहे की  कक्षप्पा व इंदि‌का या एकबीजी जुळ्याचे गुणधर्म परस्परविरुध्द आढळून येतात.