व्यक्तींची पुनर्जन्म प्रकरणे स्पष्टपणे दाखवून देतात की व्यक्तीची अधोगती जशी तिच्या आत्म्यामुळे होते. तसेच व्यक्तीची उत्क्रांति ही तिच्या आत्म्यामुळेच होते. व्यक्तीची अधोगती झाली नसती तर तिची उत्क्रांति झाल्याचे कसे कळाले असते? वास्तविक उत्क्रांति, जी मानवाच्या बाबतीत आध्यात्मिक प्रगती असते ही सामान्यतः अनाध्यात्मिक अवस्थेतून, म्हणजे सामान्य अवस्थेतून होत असते. त्यामुळे ती नजरेत भरत नाही. म्हणजे ती होत असल्याची दिसत नाही. म्हणून उत्क्रांति घडण्यासाठी अनेक जन्म घ्यावे लागतात असे गीता म्हणते.