कॉपल पांडे गायब झाला होता! पुढील भाग २
दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये पोचल्यावर मी लगेच शोध घेतला की पांडेचं काय झालं? स्टाफने सांगितलं,
"सर, काल खूप गोंधळ झाला. एक कॉर्पोरल विमानात चोरून बसायचा प्रयत्न करत होता, त्याला एअर फोर्स पोलिसांनी पकडलं. त्याला खाली उतरवलं आणि विमान १५ मिनिटं लेट झालं. नाव माहित नाही, पण तो कदाचित गार्डरूममध्ये असेल." आवाज ताठ आणि रूक्ष होता.
गार्डरूमचे वॉरंट ऑफिसर जेव्हा माझ्या स्टाफने संपर्क केला, तेव्हा त्याने सांगितलं,
"आत्ता ड्युटी घेतली आहे. लवकरच कळवतो."
पांडे कुठे आहे याचा काहीच पत्ता लागत नव्हता. मी माझ्या स्टाफला सांगितलं की त्याच्या ऑफिस अटेंडन्सची माहिती घ्या. एक एअरमनला त्याच्या बिलेटमध्ये पाठवलं की सामान तपासा. दोन्हीकडून रिपोर्ट आला - पांडे गायब!
तेवढ्यावरच तो विषय ठेवून मी माझ्या ऑफिसच्या कामात आणि रेस्क्यू एअरक्राफ्टचं पर्यवेक्षण यामध्ये बिझी झालो. दिवस गेले. आठवडे गेले.