स्टिव्हेन्सन म्हणतात की लिंगदेह / सूक्ष्म देह वगैरे (आध्यात्मिक) संकल्पनांना आपला विरोध असण्याचे कारण त्या संकल्पना सार्वजनिकरीत्या दृश्य होऊ शकत नाहीत आणि विज्ञान सार्वजनिकरीत्या दृश्य असलेल्या घटनांचाच विचार करते. they (spiritual concepts) outside the publicly observable phenomena with which science is concern ud. उपरोक्त ग्रंथ, पृ. २०८३ तळटीप.] मग प्रश्न आता की एका जन्मातील शरीरावर झालेख्या जखमांच्या खुणा दुसऱ्या जन्मातील शरीरावर कशा निर्माण होतात? व्यक्तीच्या मृत शरीरावर कृत्रिमपणे - काजळाने वगैरे - केलेल्या खुणासुध्दा व्यक्तीच्या पुनर्जन्म झाल्यानंतरच्या शरीरावर जशाच्या तशा उमटतात हे कसे? व्यक्तीच्या मृत्यूनंतरच्या व त्या व्यक्तीचा पुनर्जन्म होण्यापूर्वीच्या मधल्या काळात त्या व्यक्तीचा अदृश्य स्वरूपात लिंगदेह अस्तित्वात असल्याखेरीज अशा गोष्टी घडणे शक्य नाही हे स्पष्ट आहे, याशिवाय मेल्यानंतर अदृश्य अशरीरी स्वरूपात (लिंगदेहात) असलेल्या व्यक्तीकडून भानामती सारख्या दृश्य घटनाही घडताना दिसतात. उदा. मृत्यूनंतर अशरीरी रूपाने झाडावर वस्ती करून असताना वीरासिंगने त्या झाडाला बांधलेल्या झोपाळ्याची फळी मोडून झोके घेणाऱ्या बायकांना पाडले होते, (प्रकरण ८) ब्रह्मदेशातील माउंग तिन् सेइनने मृत्यूनंतर पॅगोडाजवळ वसती करून असताना - अर्थात् अशरीरी लिंगदेहाच्या स्वरूपात - रस्त्याने जाणाऱ्या बैलगाडीवानास दगड मारले होते. म्हणजे भानामतीमध्ये मृत व्यक्ती अदृश्य असून दृश्य घटना घडवून आणते, ती व्यक्ती अदृश्य असूनही लिंगदेहाच्या रूपाने अस्तित्वात असल्याखेरीज अशा दृष्य घटना कसे घडवून आणू शकेल? स्टिव्हेन्सननी आपल्या 'सायको फोर'च्या समर्थनार्थ सार्वजनिकरीत्या दृष्य असलेल्या पिशाच' ची उदाहरणे दिली आहेत. पण ती 'पिशाचे' दृश्य स्वरूपात प्रकट होण्यापूर्वी व अदृश्य झाल्यानंतर अशरीरी (लिंगदेहाच्या) स्वरूपात अस्तित्वात असल्याखेरीज कशी प्रकट होऊ शकतील व अदृश्यही कशी होऊ शकतील हा प्रश्न आहे. या अडचणीची जाणीव असल्यामुळेच ही पिशाच' ची उदाहरणे माझे…सायकोफोर निर्णायकपणे सिद्ध करतात असे मी म्हणत नाही असे त्यानी म्हटले आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे स्वतः स्टिव्हेन्सननी एके ठिकाणी आपला अन्य एक मुद्दा सिध्द करण्याच्या ओघात लिंगदेहाच्या अस्तित्वाचे पुरावे दिले आहेत. त्यापैकी दोन येथे देतो. एक दुर्ग जाटव नावाचा विशीच्या आतला मुलगा विषमज्वराने वारल्यानंतर त्याला यमदूत न्यायला आले. तेव्हा तो त्यांच्या हातून निसटण्याचा प्रयत्न करू लागल्यामुळे त्यानी त्याचे दोन्ही पाय गुढघ्यापासून तोडले. पण यमांने याचे आयुष्य संपले नसल्याचे सांगितल्यामुळे त्याचे पाय जोडून त्याला त्यानी परत पांठवले. स्टिव्हेन्सननी पाय जोडल्याच्या खुणा असलेल्या दोन्ही गुडघ्यांचे फोटो आपल्या ग्रंथात दिले आहेतः reincarnation and Biology Vol. I P-77)